महाराष्ट्र

maharashtra

पुण्यात बिबट्याचा मुक्त वावर कॅमेऱ्यात कैद

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव, शिरुर खेड तालुका हे बिबट्याचे सध्या माहेरघर झाले आहे. दिवसभर हिरव्यागार उसात वास्तव्य करुन रात्रीच्या सुमारास बिबट्या शिकारीच्या शोधात फिरत होता. अशात महेंद्र पाटे हे शेतकरी वडगाव आनंद येथून आळेफाटा येथे जात असताना दोन बिबट्या ऊसशेताच्या बाजुला अगदी निवांत परिसराची टेहाळणी करताना दिसून आले.

By

Published : Sep 23, 2019, 6:34 PM IST

Published : Sep 23, 2019, 6:34 PM IST

बिबट्याचा मुक्त वावर कॅमेऱ्यात कैद

पुणे- जंगलात राजा सारखा रुबाबात रहाणारा बिबट सध्या शिकारीच्या शोधात लोकवस्तीत येऊन ऊसशेतीलाच जंगल समजून वास्तव्य करु लागलाय. याच वास्तव्याचा एक व्हिडिओ जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील महेंद्र पाटे या शेतकऱ्याने काढला आहे.

बिबट्याचा मुक्त वावर कँमेरात कैद

हेही वाचा-विधानसभेच्या रणांगणात धडाडणार 'या' शिव व्याख्यात्यांच्या 'तोफा'!

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव, शिरुर खेड तालुका हे बिबट्याचे सध्या माहेरघर झाले आहे. दिवसभर हिरव्यागार ऊसात वास्तव्यकरुन रात्रीच्या सुमारास बिबट्या शिकारीच्या शोधात फिरत होता. अशात महेंद्र पाटे हे शेतकरी वडगाव आनंद येथुन आळेफाटा येथे जात असताना दोन बिबट्या ऊसशेताच्या बाजुला अगदी निवांत परिसराची टेहाळणी करताना दिसून आले. बिबट्याच्या वास्तव्याचा दुर्मिळ क्षण त्यांनी कॅमेऱ्यात कैद केलाय.

हेही वाचा- शेअर बाजाराची १३०० अंशाची उसळी; निर्देशांकाने गाठली पुन्हा ३९,००० ची पातळी

बिबट्या शिकारीसाठी लोकवस्तीत येऊन वास्तव्य करायला लागलाय. मात्र, याच वास्तव्यातून मानव व बिबट्या यांच्यात एक वेगळाच संघर्ष सुरु झाला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याकडून पाळीव प्राण्यांसह माणसांवर होणारे हल्ले वाढले आहेत. तर दुसरीकडे शिकारीच्या शोधात भटकंती करत असताना बिबट्याचे अपघात होत आहेत. त्यामुळे बिबट्याच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details