महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एका एकरात १२१ टन ऊस, बारामतीच्या २१ वर्षीय शेतकऱ्याचा पराक्रम

काटेवाडी येथील एका २१ वर्षीय युवकाने एका एकरात १२१ टन उसाचे उत्पादन मिळवले आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करुन त्याने हे यश मिळवले आहे.

By

Published : Nov 12, 2020, 3:27 PM IST

21 YEAR OLD FARMER MADE AMAZE
बारामती तरुण शेतकरी

बारामती - शेतकऱ्यांच्या मुलांसमोर बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील एका तरुणाने एक आदर्श उभा केला आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून काटेवाडी येथील एका २१ वर्षीय युवकाने एका एकरात १२१ टन उसाचे उत्पन्न मिळवले आहे. अर्जुन मासाळ असे शेती क्षेत्रात मोठे यश मिळवणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

भरघोस उत्पन्न

अर्जुन मासाळ यांनी एकूण ७ एकर शेतात द्राक्ष व उसाची लागवड केली आहे. मासाळ यांनी प्रथमच २६५ वाणाच्या उसाची लागवड केली. यासाठी त्यांनी चार फूट ऊस बेणे लावले. तसेच मायक्रो न्यूट्रिशनचा वापर, योग्य पाणी व खत व्यवस्थापनाच्या जोरावर मोठे ऊस उत्पादन केले आहे. ऊस लागवडीनंतर त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून ऊसाला पाणी व खत दिले. सरासरी एका एकरात ४० ते ६० टन ऊस उत्पादन मिळते. मात्र मासाळ यांनी केलेल्या प्रयोगशील शेतीमुळे अनेक वर्षानंतर छत्रपती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकरी १२१ टन ऊस उत्पादन मिळवले आहे.

संशोधनातून शेती

अर्जुन मासाळ हा युवा शेतकरी बारामतीतील एका नामांकित महाविद्यालयात बीएच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेतोय. त्याला मुळातच शेती क्षेत्राची आवड आहे. शेतीतून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बदलून नवीन संशोधन शेती पद्धतीची माहिती करून घ्यावी व त्या पद्धतीने शेती करावी. झिरो बजेट शेती केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होतो. इतर उद्योगांना पेक्षा शेतीला कमी भांडवल लागते. त्याचा शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा, असे या युवा शेतकऱ्याने सांगितले.

हेही वाचा -चंद्रपूर जिल्ह्यातील ५४ खरेदी केंद्रांमध्ये धान खरेदी सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details