महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Student Suicide In Bhosari : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

पिंपरी- चिंचवडमध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्याने (10th student Suicide) आत्महत्या केली (Student Suicide In Bhosari) आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्यध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यापकांवर त्याला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे, परंतु अजून त्यांना अटक करण्यात आलेली (case registered against principal) नाही.

student Suicide in Bhosari
भोसरीत विद्यार्थ्याची आत्महत्या

By

Published : Dec 29, 2022, 10:38 AM IST

Updated : Dec 29, 2022, 11:09 AM IST

पुणे :पिंपरी- चिंचवडमध्ये दहावीतील विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापकावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (10th student Suicide in Bhosari) आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आयुष गारळे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव होते. आयुष अभ्यास करत नाही, म्हणून शाळेतून काढून टाकेन, दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही, दहावीच्या परीक्षेला ही बसू देणार नाही. अशी धमकी मुख्याध्यापक हितेश शर्मा देत होते. असा त्यांच्यावर आरोप (case registered against principal) आहे.


गुन्हा दाखल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष दिघी येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेतो. त्याच शाळेत दहा डिसेंबरला आयुषला आणण्यासाठी आई स्वतः गेल्या (Student Suicide In Bhosari) होत्या. तेंव्हा मुख्याध्यापक शर्मा यांनी आईला आवाज देऊन बोलावून घेतले. वरील सर्व बाबी त्यांच्या कानावर टाकल्या. त्यामुळे आयुष टेन्शनमध्ये होता. अशातच 13 डिसेंबरला घरातील सगळे बाहेर गेले. तेंव्हा एकटाच घरी असणाऱ्या आयुषने गळफास घेत आयुष्य संपवले. या मृत्यूला मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याच आधारावर भोसरी पोलीसांनी मुख्याध्यापक शर्मा यांच्यावर 24 डिसेंबरला कलम 305 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलीसांनी अद्याप मुख्याध्यापक शर्मांना अटक केलेली नाही.

11वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या :एका अकरावीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना समोर आली होती. या विद्यार्थ्याने झोप न येत असल्यामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली (Suicide In Bhosari) होती.

सुसाईड नोट :हाविद्यार्थी आपल्या कुटुंबासह कुल्लू जिल्ह्यातील बंजार येथे भाड्याच्या घरात राहत होता. मृताच्या बहिणीने सांगितले की, ती काल संध्याकाळी घरी आली तेव्हा खोलीत तिच्या भावाचा मृतदेह पडलेला होता. ज्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. 17 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली होती. बहिणीच्या म्हणण्यानुसार, मृताने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, रात्री झोपताना मला भयानक स्वप्न पडत आहेत, त्यामुळे मी काळजीत आहे. गेल्या 6-7 दिवसांपासून मला झोप लागलेली नाही. झोप न येत असल्यामुळे तो खूप अस्वस्थ (10th student Suicide) होता.

कोणावरही संशय नाही :पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला होता. विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरदेव शर्मा यांनी सांगितले की, कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले असून विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी कोणतीही शंका उपस्थित केली नव्हती. याप्रकरणी पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ अन्वये कारवाई केली (student Suicide case registered against principal) होती.

Last Updated : Dec 29, 2022, 11:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details