पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेडीरेकनरचे मागील सहा वर्षापासून रखडलेले दर शुक्रवारी अखेर निश्चित करण्यात आले. मागील अडीच वर्षानंतर रेडीरेकनरच्या दरात यावर्षी सरासरी 1.74 टक्के इतकी दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ नैसर्गिक असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी 12 सप्टेंबरपासून हे दर लागू होतील.
दरवर्षी एक एप्रिलपासून संपूर्ण राज्यात रेडीरेकनरचे नवे दर लागू होतात. मुद्रांक शुल्क विभागाकडून रेडीरेकनरचे दर निश्चित केले जातात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे हे नवीन दर लागू करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे यापूर्वीच्या इतरांना नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने मुदतवाढ दिली होती. त्यानंतर शुक्रवारी रेडीरेकनरचे नवीन दर जाहीर करण्यात आले.