परभणी-जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे. शनिवारी परभणीत 20 जण कोरोनामुक्त झाले तर 8 कोरोना रुग्णांची वाढ झाली. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमित कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 56 संभाव्य रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत.
20 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. ज्यामध्ये परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट, परसावत नगर, पोलिस क्वार्टर, रविराज कॉर्नर, मोमीनपुरा-गांधीपार्क, कडबी मंडई, जागृती कॉलनी तसेच तालुक्यातील करडगाव, कारेगाव येथील 14 रुग्णांचा तर जिंतूर शहरातील वरूड वेस भागातील एक आणि हिवरखेड्यातील एक व सेलू शहरातील पारीख कॉलनी तसेच शास्त्री नगर व मोंढ्यातील प्रत्येकी एक या प्रमाणेच सेलू तालुक्यातील रवळगाव येथील एक अशा एकूण 5 महिला व 15 पुरूषांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यात एकूण 8 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात इनायत नगरात 1, गंगाखेड शहरातील देवळे जिनिंग भागातील 2, पूर्णा 1, मानवत शहर 2, पाथरीत 1 तर जिंतूर शहरात 1 असे एकूण 8 रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यातील आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 363 रुग्ण झाली असून, त्यातील 176 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 13 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 174 रुग्ण जिल्हा रुग्णालयातील संक्रमित कक्षात उपचार घेत आहेत.
दरम्यान,आतापर्यंत एकूण 3 हजार 815 संभाव्य रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या संसर्गजन्य कक्षात सध्या 203 जण दाखल असून, 767 जण विलगीकरण कक्षात दाखल आहेत. तर यापूर्वी 2 हजार 845 जणांनी विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. आतापर्यंत एकूण 4 हजार 47 संशयितांचे स्वॅब घेतले गेले असून, त्यातील 3 हजार 469 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर 363 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 125 स्वॅब अनिर्णायक असून 52 स्वॅब तपासणीस आयोग्य ठरले आहेत. अजूनही 42 स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा कायम आहे.
" 3 रुग्णांचा मृत्यू"
शनिवारी गंगाखेड येथील 55 वर्षीय तर परभणी येथील मुमताज कॉलनीतील 50 वर्षीय व्यक्तीचा परभणीच्या जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात मृत्यू झाला. तर जिंतूर तालुक्यातील कावी येथील 70 वर्षीय बाधिताचा देखील नांदेडमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या 13 झाली आहे.