महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाथरीत दरोडेखोरांचा घरावर हल्ला, मारहाण करून १ लाखाचा ऐवज लूटला

व्हरांड्यात झोपलेल्या भागवत वाघमारे यांच्या आईने आरडाओरड केल्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे एक सेवन पीस (अंदाजे किंमत ५० हजार रुपये) व पोत (अंदाजे किंमत ५० हजार रुपये), असा एक लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. घटनेनंतर सर्व दरोडेखोर आष्टी फाट्याकडे पळून गेले.

By

Published : Oct 17, 2020, 7:48 PM IST

पाथरीत दरोडेखोरांचा घरावर हल्ला
पाथरीत दरोडेखोरांचा घरावर हल्ला

परभणी- पाथरी शहरापासून चार किमी दूर असलेल्या बांदरवाडा शिवारातील शेतात आज पहाटे एका घरावर दरोडेखोरांनी हल्ला चढवला. यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी घरातील व्यक्तींना मारहाण करून महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. पाथरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी भागवत चतुर्भुज वाघमारे यांच्या फिर्यादीवरून दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पाथरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बांदरवाडा गाव शिवारात शेतकरी भागवत वाघमारे (वय ३८) यांचे घर आहे. नेहमीप्रमाणे काल (१६ ऑक्टोबर) संध्याकाळी घरात राहणारे त्यांचे भाऊ जानकीराम, नारायण, आई व घरातील महिला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपले होते. आज (शनिवार) पहाटे चार ते सव्वा चारच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधलेल्या पाच ते सहा चोरांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन वाघमारे यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी खोलीचे दार उघडे दिसल्याने भागवत वाघमारे यांनी दारात येऊन पाहिले असता, दरोडेखोर त्यांच्या नजरेस पडले. यावेळी दरोडेखोरांना पाहून दरवाजा बंद करण्याच्या तयारीत असलेल्या वाघमारे याच्या उजव्या हातावर व उजव्या पायावर दरोडेखोरांनी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वाघमारे यांच्या पत्नीने दार ढकलत आतून कडी लावल्याने पुढील अनर्थ टळला.

व्हरांड्यात झोपलेल्या भागवत वाघमारे यांच्या आईने यावेळी आरडाओरड केल्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे एक सेवन पीस (अंदाजे किंमत ५० हजार रुपये) व गळ्यातील पोत (अंदाजे किंमत ५० हजार रुपये), असा एक लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. घटनेनंतर सर्व दरोडेखोर आष्टी फाट्याकडे पळून गेले. त्यानंतर घरातील दरोडेखोरांनी कोंडून ठेवलेल्या इतर भावांना भागवत वाघमारे यांनी बाहेर काढले.

हेही वाचा-परभणीत ७ वर्षीय नातवाचा खून; मारेकरी चुलत आजोबाला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details