महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत ईदच्या नमाजमध्ये पूरग्रस्तांसाठी दुवा आणि निधी संकलन

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोमवारी परभणीत ईदगाह मैदानावर बकरी ईदच्या नमाजसाठी एकत्र जमलेल्या मुस्लीम बांधवांनी दुवा केली. सोबतच मदतीसाठी निधी देखील संकलित केला.

By

Published : Aug 12, 2019, 6:07 PM IST

परभणीत ईदच्या नमाजमध्ये पूरग्रस्तांसाठी दुवा आणि निधी संकलन

परभणी-सोमवारी परभणीत ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी दुवा करण्यात आली. पूरग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून यावेळी पैशाच्या स्वरुपात निधी संकलीत करण्यात आला.

परभणीत ईदच्या नमाजमध्ये पूरग्रस्तांसाठी दुवा आणि निधी संकलन

मराठवाड्यात अवकृपा दाखवणारा वरूण राजा पश्चिम महाराष्ट्रात मात्र थैमान घालत आहे. या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर सांगली आणि परिसरात महापूर आला आहे. हजारो कुटुंबांना या पूराचा फटका बसला आहे. या अस्मानी संकटात अनेक संसार उघड्यावर आले आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सोमवारी परभणीत ईदगाह मैदानावर बकरी ईदच्या नमाजसाठी एकत्र जमलेल्या मुस्लिम बांधवांनी दुवा केली. सोबतच मदतीसाठी निधी देखील संकलित केला.

राज्यातील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह बऱ्याच भागात महापुराने थैमान घातले आहे. अनेकजण मृत्यूमुखी पडले. अनेक मुकी जनावरे वाहून गेली, तर लाखो घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे देशभरातून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी लाखो हात सरसावले आहेत. परभणी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवानी सोमवारी सकाळी बकरी ईद साजरी केली. यावेळी नमाजनंतर पूरग्रस्तांसाठी दुआ करण्यात आली. सामाजिक संघटनांकडून यावेळी पूरग्रस्तांसाठी निधी संकलीत करण्यात आला. हा जमा झालेल्या निधीचा वापर पूरग्रस्तांसाठी करण्यात येणार आहे. मुस्लीम बांधवांनी शक्य होईल तेवढी मदत केली. निसर्गाने जरी अवकृपा केली असली तरी माणुसकीचे लाखो हात पूरग्रस्तांसाठी धावून जात असल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details