परभणी - लॉकडाऊनमुळे मजूर, कामगार, पर्यटक आणि विद्यार्थी अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. तसेच परभणीत देखील अशा व्यक्तींची संख्या मोठ्या आहे. प्रत्येकाला आपापल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या नागरिकांना आपल्या गावी जाता यावे व परभणीत परत येता यावे, यासाठी विशिष्ट लिंक तयार केली आहे. त्यावर माहिती भरल्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्या प्रवासाची सोय केली जाणार आहे.
परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात अडकलेले ज्या लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी आहे, त्यांनी https://covid19.mhpolice.in या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी, असे सांगितले आहे. तसेच अन्य जिल्ह्यातून परभणीत येणाऱ्यांनी देखील नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
माहिती भरताना सोबत पुढील कागदपत्रे अपलोड करावीत
1) नजीकच्या काळातील स्पष्ट फोटो (200केबीपर्यंत)
2) नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांचे कुठल्याही फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र.
3) आपल्या पत्त्याचा पुरावा किंवा आधारकार्ड (500 केबीपर्यंत)
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क करता येईल