महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आरटीपीसीआर' चाचणीबाबत जनजागृतीसाठी परभणीमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांची रॅली

परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी बुधवारी एक आढावा बैठक घेतली होती. त्यात आरटीपीसीआर चाचणी वाढवण्याबाबत विचार विनिमय केला गेला. यावेळी त्यांनी परभणी जिल्हा हा आरटीपीसीआर तपासणीत कमी आहे. मात्र, त्यातुलनेत मृत्यूदर जास्त असल्याने नागरिकांना आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर या रॅलीचा निर्णय घेण्यात आला.

officers in Parbhani appealed people to do more corona tests through rally
'आरटीपीसीआर' चाचणीबाबत जनजागृतीसाठी परभणीमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांची रॅली

By

Published : Dec 24, 2020, 1:20 AM IST

परभणी - जिल्ह्यात कोरोनाच्या आरएटी व आरटीपीसीआर तपासणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यातच परभणीचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता आरटीपीसीआर चाचणीसाठी पुढे यावे, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह जिल्हा शल्यचिकित्सक आणि मनपा आयुक्त आदी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी बुधवारी सायंकाळी शहरातून जनजागृती रॅली काढली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी बुधवारी एक आढावा बैठक घेतली होती. त्यात आरटीपीसीआर चाचणी वाढवण्याबाबत विचार विनिमय केला गेला. यावेळी त्यांनी परभणी जिल्हा हा आरटीपीसीआर तपासणीत कमी आहे. मात्र, त्यातुलनेत मृत्यूदर जास्त असल्याने नागरिकांना आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर या रॅलीचा निर्णय घेण्यात आला.

'आरटीपीसीआर' चाचणीबाबत जनजागृतीसाठी परभणीमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांची रॅली

जिल्हयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग..

एरवी रॅली, प्रभात आणि जनजागृतीच्या उपक्रमात अधिकारी वर्ग कर्मचारी, शिक्षक, विध्यार्थी आदींच्या सहभाग असतो. मात्र, या रॅलीत महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बी.एस.नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकर देशमुख, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.डी. खंदारे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आरटीपीसीआर चाचणीस घाबरू नये..

यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणार्‍या प्रत्येक रुग्णाची तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही यावेळी टाकसाळे यांनी केले. दरम्यान, आढावा बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी हातात जनजागृतीचे फलक घेऊन जिल्हा परिषदेपासून शासकीय रुग्णालयमार्गे शिवाजी चौकापर्यंत एक फेरी काढली. यात नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणीस घाबरू नये, आपली तपासणी करून घ्यावी, नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, आदी फलके अधिकार्‍यांनी हातात घेत नागरिकांना आवाहन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details