परभणी -गंगाखेड तालुक्यात डोंगरजवळा शिवारात पोलिसांनी शुक्रवारी गांजाच्या शेतीवर छापा टाकला. यावेळी शेतातून 170 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 9 लाख रुपये आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डोंगरजवळा शिवारात नाथराव देवराव मुंडे या शेतकऱ्याने शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी या शेतावर छापा टाकला. यावेळी तुरीच्या पिकात गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
'अशी केली होती गांजाची लागवड'
या झाडाची उंची पाच ते साडेसहा फूट असून कापूस व तुरीच्या पिकात गांजाची लागवड केली होती. गट नं.64 मध्ये एकूण 25 हिरवी व तीन वाळलेली झाडे आढळून आली. या शेताच्या पश्चिमेस गट नं. 65मध्येही कापूस व तुरीच्या पिकात 21 हिरवी व पाच वाळलेली झाडे असल्याचे दिसले. ही सर्व गांजाची झाडे पथकाने जप्त केली आहेत. त्याचबरोबर या शेताच्या बाजूलाच असलेल्या दगडीराम देवराव यांच्या शेताचीही पोलिसांनी पाहाणी केली. त्यामध्ये देखील कापसाच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरणी नाथराव मुंडे आणि दगडीराम देवराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
हेही वाचा- जळगावात माजी महापाैरांच्या मुलाची हत्या