परभणी - परभणीच्या दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने ( Anti terrorism cell squad Action ) मुरुंबा ते धार रोडवर गुटखा माफियांवर मोठी कारवाई केली आहे. त्यांना एका कार मधून तब्बल 9 लाख रुपयांचा गुटखा काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी आणण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार परभणीच्या दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने परभणी जवळील मुरुंबा ते धार रोडवर सापळा रचून ( Trap set Murumba to Dhar Road ) ही कार मध्यरात्री पकडून 2 आरोपींना अटक केली आहे. तसेच नांदेडच्या ज्या गुटखा माफियाकडून हा गुटखा आणण्यात आला होता, त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री लावला सापळा -
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने ( Anti-terrorism cell squads ) काल बुधवार ते आज गुरुवारच्या मध्यरात्री, परभणी तालुक्यातील मुरुंबा ते धार रोड या रस्त्यावरील धार फाटा या ठिकाणी सापळा लावला होता. त्यानुसार काळ्या रंगाच्या एका बलेनो कार मधून हा गुटखा त्या ठिकाणी आला. पोलिसांनी तात्काळ या कारवर छापा मारून हा गुटखा ताब्यात घेतला. तसेच कार मधील माणिक बापुराव कदम (वय 32 वर्षे रा.पूर्णा) आणि आनंदा उद्धवराव ढोणे (वय 25 वर्ष रा. पांगरा ता. पूर्णा) या दोघांना अटक केली.