महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत ४२ कोरोनाबाधित आढळले; २ जणांचा मृत्यू

गुरुवारी दिवसभरात परभणीत आढळलेल्या 42 रुग्णामध्ये गंगाखेडमध्ये सर्वाधिक २१ रुग्णांची भर पडली. परभणी शहरात १३, आणि तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे १ तसेच सेलूमध्ये २, पाथरी ४, मानवतमध्ये एका रुग्णाची भर पडली. या शिवाय गुरुवारी सामान्य रुग्णालयात २४ संभाव्य रुग्ण देखील दाखल झाले. सध्या १६५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

Parbhani corona update
परभणी कोरोना अपडेट

By

Published : Jul 17, 2020, 9:14 AM IST

परभणी -जिल्हावासियांना गुरुवारचा दिवस धक्के देणारा ठरला. रात्री उशिरापर्यंत आलेल्या अहवालांमध्ये एकूण ४२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यानुसार एकूण रुग्णांची संख्या ३४४ झाली आहे. तसेच २ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय नव्याने २४ संभाव्य रुग्ण दाखल झाले असून, अद्यापही ११७ संभाव्य रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित असल्याने जिल्हावासियांची चिंता कायम आहे.

परभणी जिल्हा रुग्णालयातील प्रगोगशाळेच्या नादुरुस्त मशीन सुरू झाल्याने गुरुवारी दिवसभर कोरोना संभाव्य रुग्णांचे अहवाल येत होते. त्यानुसार रात्री १०.३० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालाप्रमाणे जिल्ह्यात एकूण ४२ कोरोनाबाधित आढळून आले. मात्र, दिवसभरात एकाही रुग्ण कोरोनामुक्त झाला नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारपर्यंत ३ हजार ६८६ संभाव्य रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी ३ हजार ३ हजार २८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ११० जणांचे अहवाल अनिर्णित असल्याचे सांगण्यात येते.प्रयोगशाळेने ४८ जणांचे अहवाल फेटाळले आहेत. रात्री उशिरापर्यंत ११७ जणांचे अहवाल प्रलंबित असून ते शुक्रवारी दिवसभरात मिळण्याची शक्यता आहे.

गुरुवारी रात्री १०.३० वाजेपर्यंत आलेल्या अहवालात गंगाखेड शहरात १९ नवीन रुग्ण आणि तालुक्यात २ जण आढळले आहेत. परभणी शहरात १३ बाधित रुग्ण आढळून आले तर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे १, सेलू शहरातील सर्वोदय नगर १, हदगाव पावडे येथे १, पाथरी शहरातील एकता नगरमध्ये ३ आणि जवाहर नगरात १ आणि मानवत शहरातील रंगार गल्लीमध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. परभणी जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४४ झाली आहे. सद्यस्थितीत १६५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

गुरुवारी सकाळी जिंतूर येथील नुरानी कॉलनीतील ६० वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सायंकाळच्या सुमारास गंगाखेड येथील शेटे गल्लीत राहणाऱ्या ९० वर्षीय वृद्धाचा परभणीत उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि इतर आजार होते. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या १० झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details