महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : परभणी महापालिकेत उभारले जिल्ह्यातील पहिले निर्जंतुकीकरण कक्ष

परभणी शहर महानगरपालिकेकडून शहरात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत. आयुक्‍त रमेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी एक उपाययोजना म्‍हणून स्‍वच्‍छता निरीक्षक श्रीकांत कुरा यांनी निर्जंतुकीकरण कक्ष तयार केला आहे.

corporation sanitize center
कोरोना इफेक्ट: परभणी महापालिकेत उभारले जिल्ह्यातील पहिले निर्जंतुकीकरण कक्ष

By

Published : Apr 10, 2020, 10:34 PM IST

परभणी -कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. शिवाय स्थानिक पातळीवर देखील हा भयंकर विषाणू रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण कसे होईल, यादृष्टीने उपायोजना होत आहेत. याच पार्श्वभूमीवर परभणी महापालिकेत जिल्ह्यातील पहिले निर्जंतुकीकरण कक्ष निर्माण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज शुक्रवारी आयुक्त रमेश पवार यांच्या हस्ते झाले.

कोरोना इफेक्ट: परभणी महापालिकेत उभारले जिल्ह्यातील पहिले निर्जंतुकीकरण कक्ष

परभणी शहर महानगरपालिकेकडून शहरात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत. आयुक्‍त रमेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी एक उपाययोजना म्‍हणून स्‍वच्‍छता निरीक्षक श्रीकांत कुरा यांनी निर्जंतुकीकरण कक्ष तयार केला आहे. सदर कक्ष महापालिकेच्‍या मुख्‍य प्रवेशद्वारात उभारण्‍यात आले आहे. या कक्षामध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर त्‍या व्‍यक्‍तीच्‍या अंगावर कक्षाच्‍या वरील भागात लावलेले स्‍प्रींकलरद्वारे निर्जंतुकीरणाचे औषध फवारले जाते. ज्‍यामुळे आतील व्‍यक्‍ती काही प्रमाणात का होईना, निर्जंतुक होऊन त्‍या कक्षाबाहेर येतो.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यास मदत होणार आहे. या कक्षाच्‍या दोन्‍ही बाजू कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठीच्‍या प्राथमिक उपाययोजनांची माहिती देणारे माहिती फलक लावण्‍यात आले आहे. या कक्षाचे उद्धाटन आयुक्‍त रमेश पवार यांचे हस्‍ते करण्यात आले. या प्रसंगी रवी सोनकांबळे, उपायुक्‍त जायभाये, सहायक आयुक्‍त अल्‍केश देशमुख, शहर अभियंता वसीम पठाण, स्‍वच्‍छता निरीक्षक श्रीकांत कुरा आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details