परभणी - बीड-किनवट बसने परभणी बस स्थानकात येताच पेट घेतला. अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली होती. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. बस अद्याप कोणत्या कारणाने अचानक पेट घेतली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, प्रसंगावधान राखून प्रवाशी बसच्या बाहेर पडल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत बसचा समोरचा भाग जळून खाक झाला आहे.
परभणी स्थानकात बसच्या केबिनला आग
बीड-किनवट बसने परभणी बस स्थानकात येताच पेट घेतला. अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली होती. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. बस अद्याप कोणत्या कारणाने अचानक पेट घेतली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
बीड येथून किनवटकडे जाणारी एसटी बस परभणी बस स्थानकात आल्यानंतर वाहक शेजारी असलेल्या बोनेटने अचानक पेट घेतला आणि आग कॅबिनमध्ये पसरली. तेव्हा एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि प्रवाशांनी आग विझवण्याच्या साहित्याचा वापर करत आग नियंत्रणात आणली. दरम्यान, अग्निशामक दलाला पाचारण करण्याने आले होते. मात्र, अग्निशामक दल घटनास्थळी पोहचेपर्यत आग नियंत्रणात आली होती. या घटनेमध्ये वेळीच प्रसंगावधान राखत प्रवासी बसमधून उतरले होते.
दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. केबिनमध्ये कदाचित शॉर्टसर्किट झाले असावे आणि त्यातून ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. तरी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची चौकशी केली जाईल, अशी माहिती एसटी विभागाने दिली आहे.