महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत १२ वीच्या परीक्षेत ८ कॉपी बहाद्दरांना पकडले

या विद्यार्थ्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

8 कॉपीबहाद्दरांवर कारवाई

By

Published : Mar 20, 2019, 10:27 AM IST

परभणी - जिल्ह्यातील बारावी परीक्षेच्या दरम्यान मंगळवारी ७ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आले. या विद्यार्थ्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा घेतली जात आहे. मंगळवारी पाकशास्त्र, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयांची परीक्षा पार पडली. पाकशास्त्र विषयाच्या परीक्षेला ४३१० विद्यार्थ्यांपैकी ४१६४ विद्यार्थी हजर होते. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाची १४२८ पैकी १३९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या दरम्यान पाकशास्त्र विषयाच्या परीक्षेत ८ कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले.यामध्ये गंगाखेड तालुक्यात येणाऱ्या मोजमाबाद तांड्यावरील जय भवानी उच्च माध्यमिक विद्यालयात ७ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आले, तर एक विद्यार्थी मानवत येथील रत्नापूरच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचा आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.

दरम्यान गेल्या काही दिवसात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना मोठ्या प्रमाणात पकडण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ पृथ्वीराज बीपी यांनी स्वतः २ केंद्रांवर अचानक धाडी टाकून त्याठिकाणी चालणारा गैरप्रकार उघडकीस आणला.या कारवाईत त्यांनी सामूहिक कॉपीचा प्रकार चालवणाऱ्या तब्बल २२ शिक्षकांवर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. याखेरीज प्रत्येक दिवशी कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पकडण्यात येत आहे. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांसह विध्यार्थ्यांना जरब बसली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details