महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत भाजपसह अजित पवार समर्थकांचा जल्लोष

पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडल्यावर भाजप कार्यकर्ते व राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी परभणीत जल्लोष करून आनंद व्यक्त केला.

परभणीत जल्लोष

By

Published : Nov 23, 2019, 6:07 PM IST

परभणी- राज्यात आज महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे सांगितले जात असतानाच अचानक मध्यरात्रीतून घडामोडी घडल्या. पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी विरोध केला असला तरी परभणीत मात्र अजित पवार समर्थक तथा राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांसह भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

कार्यकर्त्यांचा परभणीत जल्लोष


भारतीय जनता पक्षाच्या व शिवसेनेच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने महाजनादेश दिला होता. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे १०५ व शिवसेनेचे ५६ सदस्य निवडून आले होते. परंतु, शिवसेना आणि भाजप यांच्यात समान अधिकार व मुख्यमंत्री पदावरून बेबनाव झाला. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाबरोबर जाऊन सेनेने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यानुसार उद्धव ठाकरे हे आज सरकार स्थापन करतील असे संकेत शुक्रवारी मिळाले होते.


परंतु, भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना रात्रीतून आपल्या बाजूने ओढून त्यांना थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. तर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी सह शिवसेना आणि काँग्रेसचे पदाधिकारी संताप व्यक्त करत असताना दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड जल्लोष दिसून येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणीतील दुसऱ्या गटातील तथा अजित पवार समर्थकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत जल्लोष करून आनंद व्यक्त केला.


येथील शिवाजी चौकात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात फटाके फोडत, गुलालाची उधळण करत दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष केला. तसेच पेढेही वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर प्रताप देशमुख, माजी शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार विजय गव्हाणे, संजय शेळके, संजय रिझवानी, मोहन कुलकर्णी, डॉ.मीनाताई परतानी, दिलीप ठाकूर, प्रमोद वाकोडकर, राजेश देशमुख, विलास चांदवडकर, मनपा सदस्य मंगल मुद्गलकर, मधुकर गव्हाणे, मोकिंद खिल्लारे, अशोक डहाळे, प्रशांत सांगळे, सुनिल देशमुख, रितेश जैन, बाळासाहेब देशमुख, अंकुश आवरगंड, नितीन वटमवार, चंद्रकांत डहाळे, मनोज पिल्ले, रामदास पवार, माधवी घोडके, विजया कातकडे, सुनिता घुगे, शंकुतला मठपती, सुहास डहाळे, संजय कुलकर्णी व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details