महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत दारूची दुकाने बंदच; मात्र मद्याची घरपोच सेवा मिळणार

परभणी जिल्ह्यात आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र असे असले तरी मद्यप्रेमींची गरज लक्षात घेऊन ऑनलाईन बुकींगच्या माध्यमातून घरपोच दारू मिळवता येणार आहे.

home delivery of liquor in Parbhani
मद्याची घरपोच सेवा मिळणार

By

Published : May 19, 2020, 4:56 PM IST

परभणी - परभणी जिल्ह्यातील मद्य शौकिनांसाठी दारूची दुकाने खुली करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार आज मंगळवार (19 मे)पासून प्रत्यक्षात दारूची दुकाने उघडणार होती. परंतु परभणी जिल्ह्यात आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र असे असले तरी मद्यप्रेमींची गरज लक्षात घेऊन ऑनलाईन बुकींगच्या माध्यमातून घरपोच दारू मिळवता येणार आहे.

मद्याची घरपोच सेवा मिळणार

'कोरोना' संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यात देखील 22 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहेत. वेळोवेळी वाढवलेल्या कालावधीचा परभणी देखील अवलंब करण्यात आला. परंतु या दरम्यान पुणे, नागपूर व इतर मोठ्या शहरांमध्ये मद्य विक्रीची परवानगी मिळाली असली तरी परभणीत मात्र अद्यापही प्रत्यक्ष मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली नाही.

या दरम्यान, मद्यप्रेमींची गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मद्य नोंदणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली. ज्या माध्यमातून मद्य खरेदीसाठी ऑनलाईन नावे मागविण्यात आले. यामध्ये परभणी जिल्ह्यातील जवळपास 8 हजार मद्यप्रेमींनी 27 हजार लिटर दारूची बुकिंग केली आहे. त्यानुसार आज मंगळवार (19 मे) पासून मद्याची दुकाने उघडणार होती. ज्यांना प्रत्यक्ष दुकानावर येऊन मद्य घ्यायचे होते, त्यांना फोनद्वारे त्यांची तारीख आणि वेळ देण्यात येणार होता आणि ज्यांनी घरपोच मागणी नोंदवली त्यांना घरपोच मद्य नेऊन देण्यात येणार आहे. मात्र या प्रक्रियेतील घरपोच सेवा जिल्हा प्रशासनाने चालू ठेवली असली तरी प्रत्यक्ष दारूची दुकाने उघडून त्या ठिकाणी विक्रीची परवानगी मात्र प्रशासनाने नाकारली आहे.

परभणी जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपला निर्णय बदलला आहे. गर्दी टाळण्यासाठी दुकाने बंद ठेवून ज्यांना घरपोच सेवा हवी आहे, त्यांना दुकानदारांनीच मद्य पुरवठा करावा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक दुकानदाराने आपले दुकान बंद ठेवून दुकानासमोर घरपोच सेवेसाठी व्हाट्सअप नंबरचे बोर्ड लावले आहेत. त्या क्रमांकांवर आपल्याला हव्या असलेल्या मद्याची मागणी नोंदवून परभणी जिल्ह्यातील नागरिकांना दारूची घरपोच सेवा मिळवता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details