महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आरोग्य सेतू' आता दूरध्वनीवरही; परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले नोंदणीचे आवाहन

स्मार्टफोन धारकांसाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसीत केलेले आरोग्य सेतू मोबाईल अॅप उपलब्ध करुन दिले आहे. अॅपद्वारे नोंदणी करून नागरिक स्वयंचाचणी करू शकतात. आता आरोग्य सेतू मोबाईल अॅप आता साध्या मोबाईलवर आणि घरातील दूरध्वनीवर देखील उपलब्ध झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

Aarogya Setu
आरोग्य सेतू

By

Published : May 8, 2020, 10:27 AM IST

परभणी -'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विकसित केलेले आरोग्य सेतू मोबाईल अॅप आता साध्या मोबाईलवर आणि घरातील दूरध्वनीवर देखील उपलब्ध झाले आहे. दुरध्वनीवरून १९२१ या क्रमांकावर मिस्ड कॉल देवून आरोग्य सेतू आयव्हीआरएस सिस्टीममध्ये नोंदणी करता येते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

स्मार्ट फोनधारकांव्यतिरीक्त भारतातील सर्व नागरिकांना साध्या मोबाईलने किंवा दूरध्वनी असलेल्या नागरिकांना आरोग्य सेतूशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू आयव्हीआरएस सेवा सुरू केली आहे. ही सेवा देशभरात उपलब्ध आहे. ही एक टोल-फ्री सेवा आहे. नागरिकांना १९२१ क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्यायचा आहे. आपण १९२१ क्रमांकावर कॉल केल्यानंतर हा कॉल डीसकनेक्ट होईल आणि आपल्या फोनवर आरोग्य मंत्रालयाकडून फोन येईल. आपल्या आरोग्यासंदर्भात काही सोपे प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची दिलेल्या उत्तरानुसार आरोग्य सेतू अॅपमधील सेल्फ असेसमेन्ट (स्वयं-चाचणी) संरेखित केले जाईल. दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे, नागरिकांना त्यांच्या आरोग्यासबंधी स्थिती दर्शवणारा एसएमएस देखील मिळणार आहे. ही सुविधा मराठीसह इतर १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीच्या सूचना आणि सतर्कतेचे संदेश नागरिकांना नियमीत पाठवण्यात येतील.

स्मार्टफोन धारकांसाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसीत केलेले आरोग्य सेतू मोबाईल अॅप उपलब्ध करुन दिले आहे. अॅपद्वारे नोंदणी करून नागरिक स्वयंचाचणी करू शकतात. तसेच या माहितीच्या आधारे नागरिकांना कोरोनाचा धोका आहे की नाही हे लक्षात येते. तसेच जर एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाच्या जवळून गेल्यास किंवा त्याच्या संपर्कात आल्यास हे अॅप याबाबत सुचित करते, अशीही माहिती जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details