परभणी - गणेशोत्सवाच्या काळात कुठेही घातपात घडू नये, यासाठी जिल्ह्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ठिकठिकाणी पाहणी करत आहे. या दरम्यान शनिवारी पुर्णा तालुक्यात डिटोनेटरच्या २० स्फोटक कांड्या सापडल्या आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -परभणी गणेश दर्शन खास तुमच्यासाठी; बघा सामाजिक, पर्यावरणीय संदेश देणारे देखावे...
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेक ठिकाणी गर्दी होत असून याचा फायदा घेत काही समाजकंटक लोकांकडून घातपात घडवण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर परभणी एटीएसने तपासणी मोहीम सुरू केली आहे. यादरम्यान, पूर्णा तालुक्यात एटीएसच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, शेख अजहर पटेल, दीपक मुदीराज यांनी पूर्णा ते चुडावा दरम्यान संशयित ट्रॅक्टर (क्र.RJ06C2683) पकडला होता. या ट्रॅक्टरची तपासणी करत असताना लोखंडी बॉक्समध्ये डिटोनेटरच्या स्फोटक जिलेटीन कांड्या आढळून आल्या आहेत.
हेही वाचा - पडघम विधानसभेचे.. परभणीतील चारही मतदारसंघासाठी भाजपकडून 51 इच्छुकांच्या मुलाखती