पालघर/वसई -येथील माणिकपूर पोलिसांनी एका तोतया पोलीसाला अटक केले आहे. पोरस विराफ जोखी असे या भामट्याचं नाव आहे. तो प्रत्यक्षात पालिकेचा ठेकेदार आहे. पोलीस असल्याचे सांगून तो लोकांची फसवणूक करत होता. काही लोकांना त्याने लुटलेही होते. विशेष म्हणजे स्वतःच्या वर्गमैत्रिणीला त्याने पोलीस असल्याचे सांगून लुटले. त्यांनंतर पीडितेने तक्रार केल्याने माणिकपूर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.
रक्कम दुप्पट करून देण्याचे दाखवत होता आमिष -
पोरस हा महानगर पालिकेचा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यानं महानगर पालिकेमध्ये कामाचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचं सर्वांना सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्या ओळखीच्या अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत त्याने अनेकांना गुंतवणूक करायला लावली. गुंतवणूक करणाऱ्यांनी काही दिवसांनी जेव्हा पैसे मागितले तेव्हा पोरस याने सर्वांना धमक्या द्यायला सुरुवात केली. त्याने फसवलेल्या लोकांना पोलीस असल्याचं सांगून शांत राहण्याची धमकी दिली.
पोलिसाचे खोटे ओळखपत्र दाखवून द्यायचा धमक्या -