महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टोलवसुली बंद! मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने सुरू

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महामार्गावरील टोल माफ करण्यात आलेला आहे. तसेच देशातील सर्व टोल बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

By

Published : Mar 26, 2020, 6:47 PM IST

टोल प्लाझा toll plaza
मुंबई अहमदाबाद रस्त्यावरील टोलवसुली बंद

पालघर -जिल्ह्यातून मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावर चारोटी आणि खानिवडे या दोन ठिकाणी टोलनाके आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या घोषणेनंतर या राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी, खानिवडे या दोन्ही टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गावर शुकशुकाट असून सध्या अत्यावश्यक सेवा देणारी वाहने फक्त सुरू आहेत.

कोरोनामुळे मुंबई अहमदाबाद रस्त्यावरील चारोटी आणि खानिवडे टोलवसुली बंद...

हेही वाचा...वाशी टोल नाक्यावर टोल वसुली बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, या दरम्यान फक्त आपत्कालीन वाहतूक आणि सेवा सुरु आहे. या सेवांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. तसेच या सुविधा अधिक गतीमान व्हाव्यात, या हेतूने राष्ट्रीय महामार्गावरील टोल आकारणी बंद करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details