वसई (पालघर) - कोरोनाच्या काळात ऐन लॉकडाऊनमध्ये वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांनी अतिक्रमण विभागातील १२७ कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून बेरोजगार केले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी याबाबत आयुक्तांना भेटून कामगारांबद्दल लेखी तक्रार करून विचारणा केली होती.
उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मांडली होती व्यथा -
मुळीक यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना भेटून लेखी पत्र देऊन या कामगारांची व्यथा मांडली होती. त्यानंतर या सर्व कामगारांनी खासदार सुप्रिया सुळे तसेच कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली होती.
खासदार सुप्रिया सुळेंनी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या केल्या सूचना -
खासदार सुप्रिया सुळे यांनी आयुक्त गंगाथरन डी यांच्याशी संवाद साधून कामगारांना पुन्हा नोकरीवर घेण्याविषयी सूचित केले होते. त्याच बरोबर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे याना संबधित बाबतीत लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने प्राजक्त तनपुरे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आयुक्तांना १२७ कामगार अन्यायकारक रितीने बडतर्फ केले असल्याने त्यांना पुन्हा कामावर रूजू करून घ्यावे, असे निर्देश देऊन कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्यासंदर्भात विचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे सर्व कामगार दिवाळी पूर्वी कामावर रूजू होणार आहेत.
हेही वाचा -..हा तर आणीबाणी लावण्याचा प्रयत्न, सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल