पालघर -रिलायन्स गॅस पाईप लाईन प्रकल्पाने बाधित शेतकरी वर्गाला योग्य मोबदला मिळावा आणि सूर्या धरणाचे पाणी स्थानिकांना मिळावे. तसेच, संपादित शेतजमिनीचा मोबदला मिळावा. या मागण्यांसाठी शेतकरीवर्ग जिल्ह्यातील डहाणूमधील तवा येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र या पत्रकार संघटनेने पाठिंबा दिला आहे, असे एन. यू. जे. महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांनी सांगितले.
सूर्या धरणाचे पाणी, रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधितांच्या मागण्यांसाठी उपोषण हेही वाचा -नक्षलवाद्यांच्या गडावर आदिवासींच्या परंपरागत ठाकुरदेव यात्रेला सुरुवात
शेतकऱ्यांना हवा योग्य मोबदला
जिल्ह्यात रिलायन्स गॅस पाईप लाईन प्रकल्पाने संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमीन मोबदल्यात तफावत आहे. योग्य मोबदला मिळाला नाही, असा आरोप उपोषणकर्त्यांकडून केला जात आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
येथील सूर्या धरणाचे पाणी स्थानिकांना द्या
जिल्ह्यातल्या सूर्या धरणाचे पाणी स्थानिकांना द्यावे. हे पाणी नेण्यासाठी एमएमआरडीएकडून पाईपलाईनचे काम केले जात आहे. ते शेतकऱ्यांच्या शेतजमिनींतून केले जात आहे. तसेच, ज्या भागातून ही पाण्याची पाईपलाईन नेली जाते, ती गावे PESA कायद्यांतर्गत येतात. 'पाणी आमच्या हक्काचे असून ते आम्हाला मिळाले पाहिजे,' असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. ही पाण्याची पाईपलाईन ही वसई-विरार महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिका नगरवस्तीला पिण्यासाठी नेली जात असल्याची माहिती उपोषणकर्त्यांकडून दिली जात आहे.
सूर्या धरणाचे पाणी, रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधितांच्या मागण्यांसाठी उपोषण सूर्या धरणाचे पाणी, रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधितांच्या मागण्यांसाठी उपोषण या उपोषणाला उदय जोशींसह पालघर जिल्हा अध्यक्ष योगेश चांदेकर, शेतकरी संघटनेचे विजय वझे आणि त्यांचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
हेही वाचा -जळगावात अवकाळी पावसाची हजेरी; रब्बीला फटका बसण्याची शक्यता