महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घिवली समुद्रकिनारी आढळला 'पॉरपॉइज' मासा

पालघर तालुक्यातील घिवली समुद्रकिनारी आज (दि. 23 जानेवारी) सकाळी काही स्थानिक मासेमार मासेमारी करत असताना त्यांना पॉरपॉइज जातीचा मासा आढळून आला. त्याला मासेमारांनी सुखरूप समुद्रात सोडले आहे.

By

Published : Jan 23, 2020, 6:27 PM IST

Updated : Jan 23, 2020, 7:10 PM IST

माशासोबत मासेमार
माशासोबत मासेमार

पालघर- तालुक्यातील घिवली समुद्रकिनारी आज (दि. 23 जानेवारी) सकाळी काही स्थानिक मासेमार मासेमारी करत असताना त्यांना पॉरपॉइज जातीचा मासा आढळून आला.

घिवली समुद्रकिनारी आढळला 'पॉरपॉइज' मासा


समुद्रात ओहोटी असल्याने हा मासा समुद्रकिनारी आल्याचे समजते. मात्र, स्थानिक मासेमारांनी या माशाला सुखरूप पुन्हा समुद्रात सोडले. पॉरपॉइज जातीच्या माशाला लहान आकाराचा व्हेल मासा, गाधा मासा, असेही म्हटले जाते. या माशाची लांबी साधारणतः 1.2 ते 1.8 मीटर तर वजन सुमारे ४५ किलोग्रॅमपर्यंत असते. हा मासा मुख्यतः उत्तर अटलांटीक महासागर, उत्तर समुद्र, बाल्टिक समुद्रात तसेच भारताच्या सागरी किनार्‍यावर आढळतो.

हेही वाचा - पालघर जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ४०५ कोटी २४ लाख रुपये सन २०२०-२१ साठी मंजूर

Last Updated : Jan 23, 2020, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details