महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

By

Published : Jul 25, 2019, 6:09 AM IST

Updated : Jul 25, 2019, 10:13 AM IST

पालघरमध्ये भूकंपाचे दोन धक्के, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

05:59 July 25

भूकंपाचे सत्र सुरूच, भीतीने नागरीक रात्रीपासून घराबाहेर

पालघर - पालघर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के अज्ञापही सुरुच आहेत. डहाणू तलासरी परिसरात बुधवारी मध्यरात्री 1 वाजून 2 मिनिटांनी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. आयएमडीच्या नोंदीनुसार याची तीव्रता 4.8 रिस्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. 

डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, दापचरी, वेवजी ते पालघरसह गुजरात राज्यातील वलसाड पर्यंत जोरदार धक्के बसल्याने पाऊस सुरू असतानाही या परिसरातील सर्व नागरिक घराबाहेर पडले. तर काहींनी रात्र घराबाहेर रस्त्यावर जागून काढली. 

मागील काही महिन्यांपासून पालघरमधील डहाणू आणि तलासरी येथे भूकंपाचे धक्के बसत आहेत. याच वर्षी 24 जानेवारीला सकाळी 9.13 आणि 9.15 वाजता डहाणू व तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के बसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रतेनुसार नोंद

बुधवारी रात्री पहिला भूकंपाचा धक्का 1.03 वाजता 3.8 रीश्‍टर स्केल, 1.15 वाजता 3.6 रीश्‍टर स्केल तसेच 2.9, 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचे असे चार भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र असल्याने सध्या नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

Last Updated : Jul 25, 2019, 10:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details