महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धामणी धरण 'ओव्हर फ्लो' झाल्याने तीन दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर जिल्हात पावसाचा जोर वाढला असून पावसाच्या पाण्याने धामणी धरण भरले आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी धरणाचे 1, 3 आणि 5 नंबरचे तीन दरवाजे 30 सेंटीमीटर इतके उघडण्यात आले आहेत. यातून 63.84 क्यूमेक्स म्हणजेच 2252 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सुर्या धरण 'ओव्हर फ्लो' झाल्याने तीन दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By

Published : Jul 26, 2019, 5:00 AM IST

पालघर- जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावासामुळे सुर्या प्रकल्पाचे धामणी धरण भरले आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्याने, धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

पालघर जिल्हात पावसाचा जोर वाढला असून पावसाच्या पाण्याने धामणी धरण भरले आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी धरणाचे 1, 3 आणि 5 नंबरचे तीन दरवाजे 30 सेंटीमीटर इतके उघडण्यात आले आहेत. यातून 63.84 क्यूमेक्स म्हणजेच 2252 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धामणी धरणासह कवडास धरण देखील ओव्हर फ्लो झाला आहे. यामुळे सूर्या नदीत एकूण 250.993 क्यूमेक्स म्हणजेच 8855 क्यूसेक इतक्या पाण्याचा सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून महसूल व पोलीस यंत्रणा या गावांमध्ये गस्त घालत आहे. धरण ओव्हर फ्लो असले तरी या पाण्याच्या विसर्गामुळे कोणताही धोका नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details