पालघर - जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या शाळेतील नर्सरी शिक्षिका व मदतनीस यांना मागील 10 महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. वांरवार मागणी करुनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आज (सोमवार) पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. जून 2019 पासून एप्रिल 2020 पर्यंत असे 10 महिन्यांचे मानधन त्वरित मिळावे अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
थकित मानधनाच्या मागणीसाठी नर्सरी शिक्षिका व मदतनिसांचे आमरण उपोषण
अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून त्या शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. मात्र, तटपुंज्या मानधनावर हे काम करीत असून, त्यांना मागील 10 महिन्यांपासूनचे मानधन अद्याप देण्यात आले नाही.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या शाळेत नर्सरी शिक्षिका व मदतनीस काम करतात. अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून त्या शिक्षण देण्याचे काम करत आहेत. मात्र, तटपुंज्या मानधनावर हे काम करीत असून, त्यांना मागील 10 महिन्यांपासूनचे मानधन अद्याप देण्यात आले नाही. या संदर्भात वारंवार मागणी करूनही जून 2019 पासून ते एप्रिल 2020 पर्यंतचे मानधन त्यांना मिळालेले नाही. अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नसून, यामुळे नर्सरी शिक्षिका व मदतनीस यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रलंबित मानधन देण्यात यावे. तसेच प्रत्येक केंद्रात नर्सरी सुरू करून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य आणि गणवेश वाटप करण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी हे आमरण उपोषण करण्यात आले.