महाराष्ट्र

maharashtra

मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By

Published : Nov 2, 2020, 9:15 PM IST

लग्न समारंभ तसेच उत्सवाच्या ठिकाणी फक्त 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र याचा सर्वात मोठा फटका देशातील मंडप डेकोरेटर्सला बसत असल्याची खंत या व्यावसायिकांनी बोलून दाखवली.

agitation in palghar
मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लग्न समारंभ, उत्सव यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांना बसत असल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी धरणे आंदोलन केले.

मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

लग्न समारंभ तसेच उत्सवाच्या ठिकाणी फक्त 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र याचा सर्वात मोठा फटका देशातील मंडप डेकोरेटर्सला बसत असल्याची खंत या व्यावसायिकांनी बोलून दाखवली. मंडप डेकोरेटर्स व्यवसाय करणारे अनेक व्यवसायिक कर्ज काढून धंदा करत आहेत. यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे या व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून उत्सव लग्न समारंभ ठिकाणी 50 ऐवजी 500 लोकांना परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांची भेट घेत बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी संबंधित समस्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.

सात महिन्यांपासून व्यवसाय बंद

कोरोनामुळे जवळपास ७ महिने कोणतेही जाहीर कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे या संबंधित क्षेत्रात काम करणारे साऊंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, ट्रस, कलाकार, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफेर्स, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर डी. जे. असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. लाखो रुपयांचे साहित्य धूळ खात पडून आहेत.

मंडप डेकोरेटर्स व संलग्न व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ

मंडप डेकोरेशन, लाईट, साऊंड, केटरिंग, मंगल कार्यालय, डीजे साऊंड, इव्हेंट मॅनेजमेंट, लॉन, घोडागाडी, बग्गी, बँड, फुल विक्रेते, फर्निचर असे अनेक व्यवसाय एकमेकांशी संलग्न आहेत. यावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असतो. मात्र, मागील आठ महिन्यांपासून या व्यवसायावर निर्बंध असल्याने घर चालवणे कठीण झाले आहे. या व्यवसायात सेवा देणारे अनेक लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. अशा स्थितीत उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न पडला असून त्यामुळे सरकारने याचे गांभीर्य ओळखून इतर व्यवसायाप्रमाणे अटी-शर्थींसह किमान पाचशे लोकांना समारंभ, लग्न आदी ठिकाणी परवानगी द्यावी, अशी मागणी पालघर जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details