महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई; दोघांना अटक, तर 80 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर तलासरी पोलिसांनी कारवाई केली असून 80 लाख 21 हजार 840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

By

Published : Dec 28, 2020, 7:37 PM IST

illegal tobacco in palghar
अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई; दोघांना अटक, तर 80 लाखांचा मुद्देमाल जप्त

पालघर - गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर तलासरी पोलिसांनी कारवाई केली असून 80 लाख 21 हजार 840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून गुजरातमार्गे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, भिवंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा आयात होतो.

अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई; दोघांना अटक, तर 80 लाखांचा मुद्देमाल जप्त

यासंबंधी गुप्त माहिती महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेल्या तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांना मिळाली. त्यानुसार काल रविवारी उशिरा तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याने भरलेले दोन आयसर टेम्पो आणि एक पोलिसांवर पाळत ठेवणारी कार, अशी तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोहे आणि चुरमुरे यांच्या टेम्पोतून गुटख्याची अवैध वाहतूक सुरू होती. विशेष म्हणजे गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या या आसशर टेम्पोच्या पुढे भारत सरकारचा बोर्ड देखील लावण्यात आला आहे.

80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

अवैध गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी तलासरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून मोहम्मद रिजवान नजीर खान (वय 40, रा.पनवेल) व राकेश राम समज कोरी (वय 30, रा. उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून दोन आयसर टेम्पो व गुटखा असा एकूण 80 लाख 21 हजार 840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपीं विरोधात तलासरी पोलीस ठाण्यात भा.द.वि.सं कलम 328, 188, 272, 273 34, सह अन्नसुरक्षा कायदा 2006 नियम व नियमाने 2011 कलम 26(2), 27, 23, 26(2)(4), 30(2)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details