महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर: सर्पदंशाने एकाचा मृत्यू; रुग्णालयाच्या हलगर्जीपणा विरोधात साखळी उपोषण

डाहे गावातील रमेश देव गवळी (वय 46) यांना 17 नोव्हेंबर रोजी सर्पदंश झाला होता. त्यांना उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना मोठ्या रूग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र, पुढील उपचारासाठी नेण्यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मिळालीच नाही.

By

Published : Nov 26, 2019, 8:47 PM IST

Snake Bite News
साखळी उपोषण

पालघर - वाडा तालुक्यातील डाहे गावात वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सर्पदंश झालेल्या रमेश गवळी यांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका वेळेवर का उपलब्ध झाली नाही? सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर लवकरात लवकर उपचार का झाले नाहीत? याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आदिवासी आधार फाऊंडेशनच्यावतीने वाडा तहसीलदार कार्यालयासमोर हे साखळी उपोषण सुरू आहे.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणा विरोधात साखळी उपोषण


डाहे गावातील रमेश देव गवळी (वय 46) यांना 17 नोव्हेंबर रोजी सर्पदंश झाला होता. त्यांना उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना मोठ्या रूग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र, पुढील उपचारासाठी नेण्यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मिळालीच नाही. त्यामुळे रूग्ण दगावला.

हेही वाचा - काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड
या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. वाडा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना अर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागण्या आदिवासी आधार फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details