महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लॉकडाऊन काळात सर्व कामगारांना कंपनीने वेतन द्यावे'

कंपनीतील कर्मचारी, कामगार, कंत्राटी कामगार असो, बांधकाम मजुरापासून अगदी शिकाऊ कामगारापर्यंत (अप्रेंटीस) या सर्वांना लॉकडाऊन काळात कंपनीने वेतन देण्यात यावे, अशी आग्रही भूमिका जनरल कामगार युनियनने (लालबावटा) राज्याचे कामगारमंत्री आणि पालघर जिल्ह्यातील बोईसर आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथल्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे केली आहे.

By

Published : May 18, 2020, 8:21 PM IST

लॉकडाऊन परिस्थिती (संग्रहित)
लॉकडाऊन परिस्थिती (संग्रहित)

पालघर - लॉकडाऊन कालावधीत कंपनीकडून कामगार वर्ग वेतन मिळावे, अशी मागणी जनरल कामगार युनियनचे (लालबावटा) अध्यक्ष राजेंद्र परांजपे सरचिटणीस बळीराम चौधरी यांनी केली आहे. ही मागणी कामगारमंत्री आणि सहायक आयुक्त यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदनही दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कामगारांना पगार हवा आहे. यासाठी ते कंपनीकडे मागणी करताना दिसत आहेत. या सर्व कामगारांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005अतंर्गत लॉकडाऊन काळातील सर्व मजूर, कर्मचारी आणि कामगारांना कंपनीने वेतन दिले पाहिजे.

कंपनीतील कर्मचारी, कामगार, कंत्राटी कामगार असो, बांधकाम मजुरापासून अगदी शिकाऊ कामगारपर्यंत (अप्रेंटीस) या सर्वांना लॉकडाऊन काळात कंपनीने वेतन देण्यात यावे, अशी आग्रही भूमिका जनरल कामगार युनियन (लालबावटा) यांनी राज्याचे कामगारमंत्री आणि पालघर जिल्ह्यातील बोईसर आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथल्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा -केंद्र सरकारने पुन्हा सुधारित आर्थिक पॅकेज घोषित करावे- काँग्रेसची मागणी

कोरोना पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन काळात कामगारांना वेतनअभावी उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. हा कामगारवर्ग आता कंपनीचे दार ठोठावत आहे. दोन दिवसापूर्वी वाडा तालक्यातील कोकाकोला कंपनीच्या गेटवर कंत्राटी कामगार आपल्या वेतनासाठी कंपनीच्या गेटवर जमले होते. यावर कंपनी आणि कामगार यांच्यात या मागणीबाबत चर्चा सुरूच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details