पालघर (वाडा) -वनपट्ट्यात बेकायदेशीररित्या घर बांधल्याचा ठपका ठेवत जव्हार तालुक्यातील जुनी जव्हार इथल्या यशवंत बाळू घाटाळ या आदिवासी कुटूंबाचे घर जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केले आहे. ही कारवाई 21 मे ला दुपारच्यावेळी वनपरिक्षेत्र जव्हार यांच्याकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाईमुळे घाटाळ यांचा संसार उघड्यावर आला आहे.
वनपट्ट्यातील आदिवासी कुटूंबाचे घर उद्ध्वस्त, वनखात्याची कारवाई चुकीची असल्याचा कुटुंबाचा आरोप
जव्हारपासून पाच किलोमीटर अंतरावर जुनी जव्हार येथील वनपट्ट्यात यशवंत घाटाळ हे पूर्वी साध्या कुडाच्या घरात राहत होते. त्यानंतर त्यांनी येथे पक्के घर बांधले. हे घर बेकायदेशीर ठरवत ते वनविभागाने जेसीबीच्या मदतीने उद्ध्वस्त केले. या कारवाईने त्यांचा ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संसार उघड्यावर आला आहे.
वनपट्ट्यातील आदिवासी कुटूंबाचे घर उद्ध्वस्त, वनखात्याची कारवाई चुकीची आदिवासी कुटुंबाचा आरोप
जव्हारपासून पाच किलोमीटर अंतरावर जुनी जव्हार येथील वनपट्ट्यात यशवंत घाटाळ हे पुर्वी साध्या कुडाच्या घरात राहत होते. त्यानंतर त्यांनी येथे पक्के घर बांधले. हे घर बेकायदेशीर ठरवत ते जेसीबीच्या मदतीने उद्ध्वस्त केले. या कारवाईने त्यांचा ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संसार उघड्यावर आला आहे. या कुटूंबाचा वनपट्ट्याचा दावा जव्हार प्रांत कार्यालयात प्रलंबित आहे. ही कारवाई चुकीची असल्याचा घाटाळ कुटुंबाचा आरोप आहे.