पालघर -वालीव परिसरातील घरफोडी व चोरींच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 62 हजार 148 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वालीव परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलीस या चोरीच्या घटनांचा तपास करत होते. दरम्यान शुक्रवारी या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
वालीव पोलिसांकडून घरफोडी प्रकरणात पाच आरोपींना अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
वालीव परिसरातील घरफोडी व चोरींच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 62 हजार 148 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घरफोडी प्रकरणात पाच जणांना अटक
शिगरूसींग राजूसींग टाक ( रा.भिवंडी), गणेश नावजी कूमावत (रा. भिवंडी), संतोष शर्मा ( रा.नालासोपारा), मुक्तार अहमद जमील अहमद कुरेशी ( रा.नालासोपारा) व मोबीन मोहम्मद रफीक खान ( रा.नालासोपारा) अशी या पाच आरोपींची नावे आहेत. वालीव परिसरात केलेल्या पाच घरफोड्यांची कबूली या आरोपींनी दिली आहे. वाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.