महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palghar News : हलाखीच्या परिस्थीतीत विद्यार्थ्याची शिक्षणासाठी धडपड, पाचवीत असूनही विद्यार्थ्याचे 125 पर्यंत पाढे तोंडपाठ

पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्याने 125 पर्यंतचे पाढे तोंडपाठ केले आहेत. त्याच्या या परिश्रमाचे त्याला फळ मिळण्याची अपेक्षा शाळेतील शिक्षकांसह त्यालाही आहे. लाडक्या पालकर असे त्याचे नाव आहे. नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षा देण्याचा निर्णय लाडक्या पालकर याने घेतला आहे.

Palghar News
हालाकीच्या परिस्थीतीत विद्यार्थ्याची शिक्षणासाठी धडपड

By

Published : Feb 5, 2023, 11:44 AM IST

हालाकीच्या परिस्थीतीत विद्यार्थ्याची शिक्षणासाठी धडपड

पालघर/डहाणू : ग्रामीण भागातील शिक्षणाचा उडालेला बोजवारा अनेक वेळा उघडकीस झाला आहे. कधी शिक्षकांच्या कमतरतेमुळे तर कधी रोजगाराच्या होणाऱ्या स्थलांतरणांमुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दुरावस्था झालेली पाहायला मिळते. मात्र अशातही लाडक्या पालकर या अवघ्या पाचवीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थ्याने 125 पर्यंतचे पाढे तोंड पाठ केले आहेत. याच लाडक्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.


11 व्या वर्षी 125 पर्यंत पाढे पाठ :लाडक्या लखमा पालकर वय वर्ष अवघे 11 वर्ष. लाडक्या हा डहाणू तालुक्यातील पूर्वेस असलेल्या कोटबी खिंडपाडा या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. लाडक्याची आई लाडक्या अवघ्या दोन ते तीन वर्षांचा असतानाच वारली. वडील रोजगारासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराबाहेर असतात. अशात लाडक्याचा सांभाळ हा त्याच्या आजीकडूनच केला जात आहे. मात्र सध्या लाडक्या एका वेगळ्याच कारणाने जिल्ह्यात चर्चेत आला आहे.


नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षा देण्याचा निर्णय :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पाचवीत शिक्षण घेणाऱ्या लाडक्याने नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र या परीक्षांसाठी गुणाकार भागाकारांसह गणित अगदी पक्क असायला हवे असे त्याला त्याच्यात शाळेत शिक्षण देणाऱ्या अंकुश धडे या शिक्षकांनी सांगितले. मग काय लाडक्या जिथे जाईल तिथे फक्त पाढ्यांसोबतच आसतो. मागील वर्षी पर्यंत 50 च्या पाढ्यांपर्यंत पाढे पाठ असणारा लाडक्या आता अगदी दोन पासून ते 125 पर्यंत सहज पाढे बोलत आहे. तेही अगदी तोंडपाठ झाले आहेत.


पहिलीपासूनच लाडक्या हुशार :पहिलीपासूनच लाडक्या हुशार असल्याने त्याला शिक्षकांकडून नेहमीच त्याचे कौतुक व्हायचे. त्यातच त्याला नवोदय आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी करण्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे लाडक्या घरकाम असेल किंवा शाळेतल्या साफसफाईचे काम तो नेहमी आपल्या खिशात पाढे लिहिलेला कागद ठेवत असतो . असे करत लाडक्याने आता 125 पर्यंतचे पाढे पाठ केले आहेत. शिक्षकांसह गावातील नागरिकांकडूनही कौतुक केले जात आहे.



ग्रामीण भागात विकास गरजेचा : कुटुंबाची आर्थीक हलाखीची असलेली परिस्थिती त्यातच पालघर सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाचा उडालेला बोजवारा याचा कुठेही ओवापोहा न करता लाडक्याने आपल्या मनाशी बांधलेली गाठ आणि केलेला निश्चय पूर्ण केला आहे. त्यामुळे लाडक्याप्रमाणेच आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीच रडगाणं मागे सोडून स्वतःच्या कर्तुत्वावर आणि जिद्दीवर आपले शिक्षण पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा :Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी टास्क फोर्स नेमणार- मॅटच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

ABOUT THE AUTHOR

...view details