पालघर - जिल्ह्यातील केळवे येथील शितलादेवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मोठ्या भक्तिमय वातावरणात दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाले होते.
असूर शक्तींवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून ठिकठिकाणी, तेजाचे अधिष्ठान असलेला हा दिवस दिपोत्सवाच्या रुपात साजरा केला जातो. यानिमित्त केळवे येथील शितलादेवी मंदिर परिसरात तसेच मंदिरासमोरील तलावाकाठी गावकऱ्यांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने तेलाचे दिवे लावले. हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात शितलादेवी मंदिराचा संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता. दरम्यान, हा नयनरम्य, विलक्षण नजारा पाहण्यासाठी संपूर्ण भाविकांनी व ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.