महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापुरामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करा; पालघरमधील शेतकऱ्यांची मागणी

महापुराचा फटका नदीकाठावरील गावांना बसला आहे. या महापुरात घरांच्या नुकसान बरोबर भातशेती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे लागवडी केलेल्या भातशेती पाण्याखाली मातीने गाडली आहेत. तसेच शेतजमीनीच्या बांधबंदीस्तीचेही नुकसान झाले आहे.

भातशेतीचे पंचनामे करणायाची शेतकऱयांची मागणी

By

Published : Aug 9, 2019, 5:44 PM IST

पालघर- महापुरामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्याची मागणी वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. येथील पिंजाळ, वैतरणा आणि तानसा या नद्यांना 4 ऑगस्टला महापूर आला होता. या महापुराचा फटका नदीकाठावरील गावांना बसला आहे. या महापुरात घरांच्या नुकसान बरोबर भातशेती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे लागवडी केलेल्या भातशेती पाण्याखाली मातीने गाडली आहेत. तसेच शेतजमीनीच्या बांधबंदीस्तीचेही नुकसान झाले आहे. महापुरामुळे शेती व इतर झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी वाडा पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार पाटील यांनी केली आहे.

भातशेतीचे पंचनामे करणायाची शेतकऱयांची मागणी

वाडा तालुक्यात 4 ऑगस्टला मुसळधार पावसाने घरांचे आणि शेतजमीनींचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पिंजाळ, वैतरणा आणि तानसा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून नदीकाठच्या पाली, बोरांडे, गोराड केळठण-निंबवली, जाळे, कळंभे, सोनाळे, नाणे, गांध्रे,आवंढा याभागात पुराच्या प्रवाहाने घरांचे व शेतजमीनींचे नुकसान झाले आहे. लागवड केलेली भातशेती चारपाच दिवस पाण्यात राहिली.

भाताची रोपे पुराच्या पाण्यामुळे गाळामध्ये गाढली गेली आहेत, तर कुठे वाहून नेली आहेत. अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. तसेच तालुक्यात भात लागवड भातशेतीचे व शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महापुरामुळे भातशेती आणि इतर नुकसान असे दोन्हीचे नुकसान भरपाईचे पंचनामे होणार आहेत. यासाठी तलाठी, कृषी कार्यालयातील कर्मचारी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून पंचनामे सुरू होणार आहेत, अशी माहिती वाड्याचे तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details