महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोईसर रेल्वे स्थानकावरील मालगाडीच्या डब्यात आढळला मृतदेह

पोलिसांना मृतदेहाच्या खिशात कागदपत्रे आढळली असून, त्यात एक आधारकार्ड सापडले. त्यावर सुबोध चंद्रकांत वोरव असे नाव असून त्यावर झारखंड येथील पत्ता आहे

By

Published : Mar 7, 2019, 3:23 AM IST

बोईसर रेल्वे स्थानक

पालघर - बोईसर रेल्वे स्थानकावरील मालगाडीच्या डब्यात मृतदेह आढळला. मृतदेहाच्या खिशात असलेल्या आधारकार्डवरुन मृतदेहाची ओळख पटली. आधारकार्डवर सुबोध चंद्रकांत वोरव असे नाव असून ते झारखंडमधील रहिवासी होत.

पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये एका मालगाडीच्या डब्यातून माल खाली करत असताना एक मृतदेह आढळला. मृतदेह आढळलेली मालगाडी टाटानगर येथून आली होती. पोलिसांना मृतदेहाच्या खिशात कागदपत्रे आढळली असून, त्यात एक आधारकार्ड सापडले. त्यावर सुबोध चंद्रकांत वोरव असे नाव असून त्यावर झारखंड येथील पत्ता आहे, अशी माहिती बोईसर आर.पी.एफचे वरिष्ठ निरीक्षक वसंत राय यांनी दिली. तसेच शवाच्या शरीरावर रक्ताचे डाग असल्याचेही समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले व बोईसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी एडीआर दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बॉइसर एम.आय.डी.सी पोलिस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details