पालघर- देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन शासनाने केले आहे. नालासोपारा शहरातील सेंट्रल पार्क मैदानात बेकायदेशीर भाजी विक्रेत्यांमुळे संचारबंदीचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. या मैदानात शेकडो बेकायदेशीर भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान मांडले असल्याने खरेदीसाठी हजारो नागरिकांची गर्दी होत आहे.
कोरोना संसर्ग वाढत असतानाही नालासोपाऱ्यात संचारबंदी अन् सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनामुळे राज्यात टाळेबंदी आहे. गर्दी टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याच्या सुचनाही शासनाने दिल्या आहेत. पण, नालासोपाऱ्यातील भाजी मंडईत नागरिकांची गर्दी करत सामाजिक अंतराचा फज्जा उडवला.
बाजारातील गर्दी
शिवाय येथे सोशल डिस्टन्सिंगही पाळली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. या बाजाराबाबत स्थानिकांकडून अनेक तक्रारी करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याने येथील स्थानिक हतबल झाले आहेत.
हेही वाचा -वसईमध्ये चार नव्याने कोरोनाग्रस्तांची वाढ; एकूण संख्या 13वर
Last Updated : Apr 5, 2020, 5:15 PM IST