पालघर -कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जिल्ह्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात आली होती. त्यांची जिल्ह्यातल्या विविध कोविड सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आली, त्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. मात्र अचानक त्यांना आता सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. तसेच त्यांचे वेतनही थकवले असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आज या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान अचानक कामावरून काढून टाकण्यात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, तसेच थकीत वेतन तातडीने मिळावे यासाठी महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन, योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले होते, मात्र महिनाभरानंतरही काहीच कारवाई न झाल्याने, संतप्त झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
कोरोना रुग्णांच्या सेवेत बजावली महत्त्वाची भूमीका
देशात गेल्या मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत होती. दरम्यान त्यासाठी शासनाकडून कंत्राटी तत्त्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. मात्र कोरोनाचा प्रदुर्भाव कमी होताच, त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष