महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेतर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे पालघर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी. शेतात कोणत्याही पिकाची लागवड केलेली असो, एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

Agitation in front of Palghar tehsildar office
तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

By

Published : Nov 26, 2019, 9:51 PM IST

Updated : Nov 26, 2019, 9:58 PM IST

पालघर -मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेने पालघर तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेतर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा


या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे पालघर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी. शेतात कोणत्याही पिकाची लागवड केलेली असो, एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.


पालघर जिल्ह्यात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, तरुण, महिला यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे सर्व प्रश्न मार्गी लागावेत यासाठीही हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट असताना वन खात्याकडून वनपट्टेधारकांना नोटीस पाठवणे सुरू आहे. प्रशासनाने या गोष्टी थांबवून नागरिकांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलकांच्या मागण्या -
१. पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
२. प्रलंबित असलेले वनदावे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही नुकसानग्रस्त म्हणून भरपाई द्यावी.
३. सर्व आदिवासी शेतकऱ्यांना सोसायटीमधून वर्षभर खावटी धान्याची व्यवस्था करावी.
४. दारिद्र रेषेखालील कुटुंबांना रेशन कार्डवर साखर देण्याची व्यवस्था करावी.
५. बोईसर औद्योगिक वसाहतीमध्ये पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी.
६. बोईसर शहरामध्ये कचरा कुंडीची व्यवस्था करावी.
७. पालघरमधील सरकारी, शहरी व ग्रामीण रूग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे.
८. शहरी व ग्रामीण भागात विजेची व्यवस्था करावी.
९. बोईसर पालघर औद्योगिक वसाहतीमध्ये सांडपाणी व प्रदूषणावर नियंत्रण झाले पाहिजे.
१०. केळवे रेल्वे स्टेशनजवळ भुयारी मार्गांची व्यवस्था करावी.
११. वाकसई गावातील नाल्यावर मोठ्या पुलाची व्यवस्था करावी.
१२. मुंबई-वडोदरा हायवे रद्द झाला पाहिजे.
१३. बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द झाला पाहिजे.

Last Updated : Nov 26, 2019, 9:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details