महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

swimmer Shubham Vanmali : अध्ययन अक्षमतेच्या जागृती उपक्रमसाठी; बोर्डी ते डहाणू बीच पोहणार जलतरणपटू

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू शुभम धनंजय वनमाळी (Swimmer Shubham Vanmali ) १४ नोव्हेंबरला अध्ययन अक्षमतेच्या जागृतीसाठी (Adhyayan Akshamata awareness) बोर्डी बीच ते डहाणू बीच दरम्यान (Bordi to Dahanu Beach will swim) पोहनार आहे. शिवछत्रपती अवॉर्ड विजेता आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू असणारा शिवम, बोर्डी बीच ते डहाणू बीच हे २३ किलोमीटर अंतर सकाळी सात वाजता पासुन सुरू करणार असुन; तो डहाणू बीच येथे ११.३० ला पोहचणार आहे.

swimmer Shubham Vanmali
जलतरणपटू शुभम वनमाळी

By

Published : Nov 9, 2022, 4:02 PM IST

पालघर-डहाणू : डहाणू तालुक्यातील कासा ही कर्म भूमी असणारा, सध्या नेरूळ येथे वास्तव्य असलेला शुभम धनंजय वनमाळी (Swimmer Shubham Vanmali) १४ नोव्हेंबरला अध्ययन अक्षमतेच्या जागृतीसाठी (Adhyayan Akshamata awareness) बोर्डी बीच ते डहाणू बीच दरम्यान (Bordi to Dahanu Beach will swim) पोहनार आहे. शिवछत्रपती अवॉर्ड विजेता आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू असणारा शिवम, बोर्डी बीच ते डहाणू बीच हे २३ किलोमीटर अंतर सकाळी सात वाजता पासुन सुरू करणार असुन; तो डहाणू बीच येथे ११.३० ला पोहचणार आहे.

आंतरराष्ट्रीय खाड्या पोहून केले विक्रम : यापूर्वी शुभमने जगातील जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी , जिब्राल्टरची सामुद्रधुनी कॅटलीना खाडी , मॅनहटन मॅरेथॉन स्विम, राऊंड ट्रीप एन्जल आयलँड स्विम, परहेन्शियन आयलँड मॅरेथॉन स्वीम, राजभवन, वाळकेश्वर ते गेटवे ऑफ इंडिया, धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया आणि गेटवे ऑफ इंडिया धरमतर अशा विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खाड्या पोहून विक्रम केलेले आहेत . हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील अध्ययन अक्षमतेच्या जागरुकतेसाठी करीत आहे. या स्विमचे वैशिष्ट असे आहे की, गत वर्षी च्या डिसेंबर महिन्यात त्याने गेटवे ऑफ इंडिया ते डहाणू बिच १४७ किलोमीटर अंतर पार केलं होते. या मोहिमेत डहाणू व परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी जलतरणाच्या माध्यमातून हे स्विम करणार आहे. या स्वीमला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळेल अशी खात्री आहे.



गोवा ते मुंबई पोहण्याचा मानस : येत्या महिनाभरात गोवा ते मुंबई असा ४१३ किलोमीटरचा सागरी प्रवास ११ ते १५ दिवसात पोहून पार करण्याचा शुभमचा मानस आहे . परंतु प्रायोजक, देणगीदार मिळत नसल्याने हा कार्यक्रम थोडा पुढे जाऊ शकतो, असे शुभमचे वडील प्रसिद्ध व्हॉलिबाल पटू धनंजय वनमाळी यांनी सांगितले. शुभम सध्या डोंबिवली नजीक असलेल्या पलावा लेकशोअर येथे माजी आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू रूपाली रेपाळे आणि माजी राष्ट्रीय जलतरणपटू अनिरुद्ध महाडिक, एन्. आय. एस. प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. शुभमच्या या उपक्रमाबदल पालघर जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details