पालघर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वर्षा आँर्गेनिक या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाची दाहकता इतकी तीव्र होती की, औद्योगिक वसाहतीच्या आसपासचा सुमारे 5 किलोमीटर परिसर यामुळे हादरला. या स्फोटात दोन कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही कामगारांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील 'वर्षा आँर्गेनिक' या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; 2 कामगार गंभीर
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट एन 154 येथील वर्षा आँर्गेनिक या रासायनिक कारखान्याच्या रिक्टरमध्ये रात्री बाराच्या सुमारास भीषण स्फोट झाला.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट एन 154 येथील वर्षा आँर्गेनिक या रासायनिक कारखान्याच्या रिक्टरमध्ये रात्री बाराच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यानंतर लगेचच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्फोटात 2 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत असून हे दोन्ही कामगार गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तारापुरमध्ये गेल्या काही महिन्यात अपघाताची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावर निर्माण झाले आहे.