पालघर- लोकसभा मतदारसंघात मुख्य लढत महायुतीचे राजेंद्र गावित विरुद्ध बहुजन विकास आघाडी पुरस्कृत महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यात रंगणार आहे. मात्र, बहुजन विकास आघाडीला पालघरमध्ये काही प्रमाणात झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी "शिट्टी" या चिन्हासाठी आग्रही असलेल्या बहुजन विकास आघाडीला "रिक्षा" हे चिन्ह देण्यात आले आहे.
बहुजन विकास आघाडीला "शिट्टी" ऐवजी "रिक्षा" निशाणी
लोकसभा निवडणुकीसाठी "शिट्टी" या चिन्हासाठी आग्रही असलेल्या बहुजन विकास आघाडीला "रिक्षा" हे चिन्ह देण्यात आले आहे.
बहुजन विकास आघाडी
मध्यरात्री साडेबारा वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे चिन्हाबाबत सुनावणी झाली. त्यानंतर बहुजन विकास आघाडीला "रिक्षा" हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. पालघर लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ पैकी ९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत.
Last Updated : Apr 13, 2019, 3:32 PM IST