महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 10, 2021, 1:22 AM IST

ETV Bharat / state

पालघरमधील अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिकेची कार्यालयातच हत्या

पालघर रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या ओम शांती देवा अपार्टमेंटमध्ये अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय आहे. या कार्यालयात अज्ञात इसमाने साधना चौधरी यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली.

Ashtavinayak Nagari Sahakari credit society  director murder
पालघरमधील अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिकाची कार्यालयातच हत्या

पालघर -अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिकेची कार्यालयातच धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साधना रामकृष्ण चौधरी (वय 52) असे मृत संचालिकेचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पालघरमधील अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिकेची कार्यालयातच हत्या

पालघर रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या ओम शांती देवा अपार्टमेंटमध्ये अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय आहे. या कार्यालयात अज्ञात इसमाने साधना चौधरी यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. हत्या करून अज्ञात आरोपी फरार झाला असून संस्थेच्या कार्यालयात त्यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.

साधना रामकृष्ण चौधरी

घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पालघर पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा - बहिणीच्या लग्नासाठी फटाके आणायला गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details