पालघर/वसई - वसई पोलिसांच्या तावडीतून एक आरोपी पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बशीर शेख (५०) असं आरोपीचं नाव आहे. शुक्रवारी दुपारी वसई पोलिसांकडून आरोपीला वसई न्यायालयात हजर करण्यात येत होते. यावेळी आरोपी बशीर पोलिसांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाला. दरम्यान, या घटनेला वसईचेच सहाय्यक पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनीही दुजोरा दिला आहे.
हेही वाचारत :कोरोना प्रतिबंधक बीएमसी महिला मार्शलला मारहाण
आरोपीच्या कुटुंबियांचा पोलिसांवर आरोप
फसवणुकीप्रकरणी आरोपी बशीरला वसई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला वसई न्यायालयात हजर केले जात होते. पण पोलिसांना चकवा देऊन त्यांच्या तावडीतून आरोपी पळून गेला. मात्र, यानंतर पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांवर मुजोरी केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबियांना प्रथम कोर्ट परिसरात आणि नंतर पोलीस ठाण्यात बंदिस्त करून ठेवले. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे बशीर पळून गेला. पण यामुळे आम्हाला पोलिसांचा नाहक त्रास सहन करावा लागला, असा आरोप आरोपीच्या कुटुंबियांनी केला आहे.
हेही वाचा :सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ.. हिरेन मृत्यू प्रकरण एनआयएकडे !
पत्रकारांच्या दिशाभूलीचाही कुटुंबियांचा आरोप
वसई पोलिसांना पत्रकारांकडून घटनेची महिती विचारण्यात आली. मात्र पत्रकारांनाही खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, असेही आरोपीच्या कुटुंबियांनी म्हटले.