महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Old Currency Found : भुईगाव समुद्र किनाऱ्यावर सापडल्या 57 हजाराच्या जुन्या नोटा

एक पर्यावरण स्नेही आपल्या कुटुंबासह गेल्या सहा वर्षांपासून दर रविवारी समुद्र किनाऱ्यावर (Bhuigaon beach) स्वछता मोहीम राबवित आहेत. या दरम्यान त्यांना एका बॅगमध्ये (Old Currency Found) एक हजारांच्या तीन नोटा व पाचशेच्या 108 नोटा सापडल्या (old currency notes found) आहेत. नोटबंदीनंतर हे पैसे काही कामाचे नसल्याने कोणीतरी ह्या नोटा फेकून दिल्याचा अंदाज बांधला जात आहे. (Latest news from Vasai)

Old Currency Found
चलनबाह्य नोटा आढळल्याने खळबळ

By

Published : Dec 13, 2022, 3:13 PM IST

वसई (पालघर) : वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर (Bhuigaon beach) स्वछता मोहीम राबविणाऱ्या एका जोडप्याला 57 हजार रुपयांच्या (Old Currency Found) बंद चलणाच्या जुन्या नोटा सापडल्याची (old currency notes found ) घटना घडली. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ते समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक व कचरा गोळा करण्याचे काम करीत असताना त्यांना एका बॅगमध्ये ह्या नोटा आढळून आल्या आहेत. (Latest news from Vasai)

चलनबाह्य नोटा

चलनी नसलेल्या नोटा फेकल्या :वसईत राहणारे लिसबोन फेराव व त्यांच्या पत्नी सुजान फेराव या आपल्या कुटुंबासह गेल्या सहा वर्षांपासून दर रविवारी समुद्र किनाऱ्यावर स्वछता मोहीम राबवित आहेत. बॅगमध्ये एक हजारांच्या तीन नोटा व पाचशेच्या 108 नोटा सापडल्या आहेत. नोटबंदीनंतर हे पैसे काही कामाचे नसल्याने कोणीतरी ह्या नोटा फेकून दिल्याचा अंदाज बांधला जात आहे.

चलनबाह्य नोटा

नोटा पोलिसांच्या ताब्यात :ह्या नोटा कोणाच्या आहेत याचा पत्ता लागला नाही. मात्र लिसबोन यांनी तात्काळ सापडलेले पैसे वसई पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details