महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेफ्टी टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या ३ मजुरांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

आनंद व्ह्यू या सोसायटीचा सेफ्टी टँक भरल्याने ३ कामगार टँक साफ करण्यासाठी त्यात उतरले होते. मात्र, टाकीमध्ये जमा झालेल्या विषारी वायुमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. सुनील चवरिया, बिका बुंबक, प्रदीप सरवटे अशी मृतांची नावे आहेत.

By

Published : May 3, 2019, 8:21 PM IST

Updated : May 3, 2019, 10:08 PM IST

सेफ्टी टँकमधील विषारी वायुमुळे ३ मजुरांचा गुदमरून मृत्यू

पालघर- नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावातील आनंद व्ह्यू सोसायटीमध्ये सेफ्टी टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या ३ कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. सुनील चवरिया (२५), बिका बुंबक (३५), प्रदीप सरवटे (३०) अशी मृतांची नावे आहेत. यापैखी एक जण हनुमान नगर येथे तर गोखीवरे देवीपाडा येथे दोघे राहत होते.

सेफ्टी टँकमधील विषारी वायुमुळे ३ मजुरांचा गुदमरून मृत्यू

आनंद व्ह्यू या सोसायटीची सेफ्टी टँक भरल्याने साफ करण्यासाठी हे कामगार उतरले होते. मात्र, टाकीमध्ये जमा झालेल्या विषारी वायूमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. याबाबतची माहिती रहिवाशांनी अग्निशमन जवानांना दिल्यानंतर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास टँकमधून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पुढील तपासासाठी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून नालासोपारा पोलीस अधिक तपास करत आहेत.

या तिघांच्या मृत्यूनंतर वाल्मिकी समाज एकत्र आला असून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या ३ कामगारांचा मृत्यूबाबत नालासोपारा पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी बिल्डर रमेश भोरा, सुरेश जैन, पुष्कर जैन, धर्मेश जैन, विनोद जैन, नंदलाल दुबे, तेजप्रकाश मेहता, इतर भागीदार व सुपरवायझर अबुसामद अबुसिद्धीकी शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : May 3, 2019, 10:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details