पालघर - विरार येथील चंदनसार-कोपरीनाका येथे बाथरूम मधील पाण्याच्या टबमध्ये बुडून 18 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवनी भरत सोनवणे असे या घटनेत मृत चिमुकलीचे नाव आहे. अवनीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विरारमध्ये बाथरूमधील पाण्याच्या टबमध्ये बुडून 18 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
विरार पूर्व येथील चंदनसार-कोपरीनाका परिसरातील नित्यानंद अपार्टमेंट, रूम नं 204 येथील रहिवासी जयश्री भरत सोनावणे यांची मुलगी अवनी ही खेळता-खेळता बाथरूममध्ये गेली व तेथे पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडली. पाण्याच्या टबमध्ये बुडल्याने अवनीचा मृत्यू झाला.
विरार पूर्व येथील चंदनसार-कोपरीनाका परिसरातील नित्यानंद अपार्टमेंट, रूम नं 204 येथील रहिवासी जयश्री भरत सोनावणे या आपली 18 महिन्यांची मुलगी अवनी हिला एकटीलाच घरात ठेऊन कचरा टाकण्यासाठी बिल्डिंग खाली गेल्या. त्यावेळी अवनी खेळत खेळत बाथरूममध्ये गेली व तेथे पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडली. जयश्री सोनावणे कचरा टाकून घरी परतल्यानंतर त्यांना अवनी बाथरूमधील पाण्याच्या टबमध्ये पडलेली दिसली.
तातडीने त्यांनी अवनीला विरार येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.