उस्मानाबाद- राज्याचे जलसंधारणमंत्री डॉ. तानाजी सावंत हे गेल्या 2 दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. शनिवारी सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकार्यांचीची बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना त्यांच्या निष्क्रियतेबद्दल आणि रटाळ कामाबद्दल मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
चारा छावणी चालकांचे अडवलेले बिल, छावणी चालकांना पाण्यासाठीचे मिळणारे बिल आणि त्यासंबंधीची माहिती अजूनही देण्यात आली नाही. तसेच पाणी टंचाईबरोबर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्ज प्रकरणासंबंधी अधिकाऱ्यांना सांवतांनी धारेवर धरले. उस्मानाबाद शहराला तब्बल 20 ते 25 दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना त्यांच्या नियोजनाबद्दल मंत्र्यांनी विचारले. तसेच पाण्यासंबंधी नियोजन का केले नाही? असा सवालही सांवतांनी केला.