महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हैदराबाद साहित्य संमेलन घेणे व्यावहारिकदृष्ट्या अवघड, मात्र आम्ही उत्साही'

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना.धो महानोर यांनी उद्घाटन केल्यानंतर सुरुवात झाली. यावेळी हैदराबाद साहित्य मंडळाच्या विद्या देवधर यांनी या साहित्य उत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Vidya Devdhar said that it was practically difficult to attend a literary meeting in Hyderabad
हैदराबाद साहित्य मंडळाच्या विद्या देवधर

By

Published : Jan 10, 2020, 11:46 PM IST

उस्मानाबाद - ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज ना. धो महानोर यांनी उद्घाटन केल्यानंतर सुरुवात झाली. साहित्य संमेलनासाठी विविध ठिकाणाहून प्रकाशक कवी साहित्य महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून शहरात दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे हैदराबाद साहित्य मंडळाच्या विद्या देवधर यांनी या साहित्य उत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

हैदराबाद साहित्य मंडळाच्या विद्या देवधर

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या सैनिकी साहित्य संमेलन आहे. यापर्वी हैदराबाद येथे मराठी साहित्य संमेलन झाले असून सध्या हैदराबादचा मराठी समाज हा विखुरला गेला आहे. हैदराबाद येथे जवळपास पाच ते सहा लाख मराठी लोक राहतात. त्यातले एका लाख लोक नोकरीनिमित्त येणारी- जाणारी आहेत. मात्र, तरी हा मराठी समाज एकवटलेला नसल्याने हैदराबाद येथे साहित्य संमेलन घेणे हे व्यवस्थेच्या दृष्टीने अवघड वाटत आहे, तरीही आमचा उत्साह आहे.

येथील तरूणांचा उत्साह आहे की, हैदराबाद येथे साहित्य संमेलन झाले तर आम्ही उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊ अशी प्रतिक्रिया देवधर यांनी ई. टीव्ही भारतशी बोलताना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details